कृषि उत्पन्न बाजार समिती , आहिल्यानगर
कृषि उत्पन्न बाजार समिती, अहिल्यानगरची स्थापना सन १/१०/१९५४ साली झालेली आहे. अहिल्यानगरचे भुसार यार्डवर बीड, संभाजीनगर व पुणे या जिल्हयामधुन भुसार मालाची आवक येत आहे. तसेच आंध्रप्रदेश मधून वाळलेली मिरचीची मोठया प्रमाणात आवक येत आहे. अहिल्यानगर हे मुग, चिंच व गुळाचे मुख्य बाजारपेठ आहे. मुख्य यार्डवर धान्य मार्केट, फळे भाजीपाला मार्केट व फुलाचे मार्केट व चारा मार्केट सदय स्थितीत सुरु आहे. नगर तालुक्यात काही गावामध्ये फुल व्यवसाय मोठया प्रमाणात होत असून त्यामुळे समितीने भाजीपाला विभागामध्ये काही शेतकऱ्यांचे मुलांना गाळे देऊन त्याठिकाणी फुलाचे मार्केट सुरु केलेले असल्याने फुलशेतीमुळे शेतकऱ्यांचा चांगला आर्थीक फायदा होत आहे. अहिल्यानगर येथील मुख्य यार्डवर बीड, संभाजीनगर,नाशिक व पुणे या जिल्हयामधून कांदा या शेतीमालाची आवक मोठया प्रमाणात होत असल्याने सदरचे यार्ड हे व्यवसायासाठी कमी पडत होते. तसेंच कांदा लिलावाचे दिवशी संपुर्ण अहिल्यानगर शहरामध्ये वाहनांची गर्दी होऊन संपुर्ण रस्ते बंद होत होते व त्यामुळे शेतकऱ्यांचे आग्रहास्तव बाजार समितीने नेप्ती येथे २९ एकर जागा खरेदी करुन त्याठिकाणी ७२ हजार स्क्वेअर फुटाचे कांदा ग्रेडींग शेडचे बांधकाम केलेले आहे. एकूण २९ एकरपेकी २१ एकर जागेवर सदरचे कांदाशेड व ४२३ व्यापारी व कर्मशिअल गाळयांची उभारणी केलेली आहे.
सर्व माहितीसाठी....
