कृषि उत्पन्न बाजार समिती , आहिल्यानगर

कृषि उत्पन्न बाजार समिती, अहिल्यानगरची स्थापना सन १/१०/१९५४ साली झालेली आहे. अहिल्यानगरचे भुसार यार्डवर बीड, संभाजीनगर व पुणे या जिल्हयामधुन भुसार मालाची आवक येत आहे. तसेच आंध्रप्रदेश मधून वाळलेली मिरचीची मोठया प्रमाणात आवक येत आहे. अहिल्यानगर हे मुग, चिंच व गुळाचे मुख्य बाजारपेठ आहे. मुख्य यार्डवर धान्य मार्केट, फळे भाजीपाला मार्केट व फुलाचे मार्केट व चारा मार्केट सदय स्थितीत सुरु आहे. नगर तालुक्यात काही गावामध्ये फुल व्यवसाय मोठया प्रमाणात होत असून त्यामुळे समितीने भाजीपाला विभागामध्ये काही शेतकऱ्यांचे मुलांना गाळे देऊन त्याठिकाणी फुलाचे मार्केट सुरु केलेले असल्याने फुलशेतीमुळे शेतकऱ्यांचा चांगला आर्थीक फायदा होत आहे. अहिल्यानगर येथील मुख्य यार्डवर बीड, संभाजीनगर,नाशिक व पुणे या जिल्हयामधून कांदा या शेतीमालाची आवक मोठया प्रमाणात होत असल्याने सदरचे यार्ड हे व्यवसायासाठी कमी पडत होते. तसेंच कांदा लिलावाचे दिवशी संपुर्ण अहिल्यानगर शहरामध्ये वाहनांची गर्दी होऊन संपुर्ण रस्ते बंद होत होते व त्यामुळे शेतकऱ्यांचे आग्रहास्तव बाजार समितीने नेप्ती येथे २९ एकर जागा खरेदी करुन त्याठिकाणी ७२ हजार स्क्वेअर फुटाचे कांदा ग्रेडींग शेडचे बांधकाम केलेले आहे. एकूण २९ एकरपेकी २१ एकर जागेवर सदरचे कांदाशेड व ४२३ व्यापारी व कर्मशिअल गाळयांची उभारणी केलेली आहे. त्यानंतर नेप्ती उपबाजार आवारामध्ये ७ एकर जागा शिल्लक होती, व नेप्ती उपबाजार येथे सध्याची जागा कमी पडत असल्याने नविन शेजारील शिल्लक असलेल्या ७ एकर जागेत नव्याने कांदा लिलाव शेड, अंतर्गत रस्ते, विदयुत पुरवठा, वॉलकपौंड इत्यादीची उभारणी करणार आहोत. त्याचबरोबर कांदा ग्रेडींग शेडचे बांधकामामुळे शेतकऱ्यांचे मालाचे ऊन, वारा,पाऊस यापासुन संरक्षण होत आहे. नेप्ती उपबाजार आवारामध्ये कांदा या शेतीमालाची वार्षिक आवक ३३ ते ३५ लाख क्विंटल होत आहे. त्यामुळे सदर शेडचे बांधकाम करणे गरजेचे आहे. सदर शेडच्या खर्चास १३ कोटी ७२ लाख एवढा खर्च अपेक्षीत आहे.

तसेच चिचोंडी पाटील येथे बाजार समितीची ११ एकर जमिन स्वमालकीची आहे. शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करुन त्याठीकाणी धान्य बाजार व जनांवरांचा बाजार उभारणी करणेसाठी मा.आ.शिवाजीराव कर्डीले साहेब यांचेकडे वांरवार मागणी केलेली होती. त्यास अनुसरुन मा.आ.शिवाजीराव कर्डीले साहेब यांच्या मार्गदर्शानाखाली विदयमान संचालक मंडळाने मौजे. चिचोंडी पाटील येथे धान्य बाजार व जनावंराचा बाजार उभारणी करण्यांचे ठरविले. त्याचा खर्च एस्टीमेट प्रमाणे १०.२६ कोटी अपेक्षित आहे.

सदय परिस्थितीमध्ये २०२४-२०२५ चे उत्पन्न हे २३ कोटी २५ लाख झालेले आहे. तसेंच समितीकडे मुख्य बाजार आवार आहिल्यानगर शहरामध्ये २८ एकर तसेच उपबाजार नेप्ती येथे २९ एकर व उपबाजार आवार चिचोंडी पाटील येथे ११ एकर अशी जमिन स्वमालकीचे जमिन उपलब्ध आहे.

मुख्य बाजार आवारामध्ये भुसार विभाग व भाजीपाला विभाग असे दोन विभाग असून उपबाजार आवार नेप्ती येथे कांदा या नियमित शेतमालाचा व्यवहार सुरु आहे. या तीनही विभागापासुन बाजार समितीस मागील वर्षामध्ये बाजार फी व गाळा भाडे पोटी खालीलप्रामाणे उत्पन्न मिळालेले आहे.

आर्थिक वर्ष वार्षिक उत्पन्न (रु) वाढावा(रु) तूट (रु)
२०२४-२५ २३,२५,५९,७१७.२७ २०,०८,९३,४२९.५० ३,१६,६६,२८७.७७

बाजार समितीस झालेली मालाची आवक व त्यापासुन समितीस सदर धान्य बाजार वरीलप्रमाणे बाजार समितीस मागील पाच वर्षात वर्षामध्ये समितीचे उत्पन्नात रक्कम रुपये ३,१६,६६,२८७/- नी वाढ झालेली आहे.

सध्या बाजार समितीकडे १३८ पदांचे स्टाफ शेडयुल मंजुर असून त्यापैकी १२३ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. पुरवणी अर्थसंकल्पाप्रमाणे सन २०२४-२०२५ चे प्रमाणे आस्थापना खर्चाची टक्केवारी ४१.०९ आहे. सध्या समितीचे खालीलप्रमाणे विविध विभागामध्ये कर्मचारी कामकाज करत आहेत.

अ.नं. विभागाचे नाव कार्यरत कर्मचारी संख्या
मुख्य कार्यालय कर्मचारी ४०
नेप्ती उपबाजार आवार कर्मचारी २५
भुसार विभाग कर्मचारी १३
भाजीपाला विभाग कर्मचारी १२
सुरक्षा विभाग कर्मचारी १३
एकूण कर्मचारी १२३

बाजार समितीचे मुख्य यार्डवर भुसार विभाग, भाजीपाला विभाग व नेप्ती उपबाजार आवारामध्ये एकूण आडते ५८१, व्यापारी/खरेदीदार ३७५, मापाडी १७५, हमाल १४३ कार्यरत आहेत.

बाजार समितीचे एकूण १८ सदस्यांचे संचालक मंडळ असून ते दिनांक २९/०४/२०२३ रोजी अस्तीत्वात आले आहे. समितीचे सभापती म्हणून श्री.भाऊसाहेब नानासाहेब बोठे, तर उपसभापती श्री.रभाजी मुक्ताजी सुळ तसेंच श्री.अभय बाबासाहेब भिसे हे सचिव म्हणून कामकाज पाहात आहेत.

समितीने या अगोदर नेप्ती उपबाजार येथे २१ एकर मध्ये बाजार आवार उभारणी साठी ४० कोटी रुपयांचे कर्ज अ‍ॅक्सिस बँकेकडून घेतेलेल होते, व सदयस्थितीत कर्ज परतफेड केलेली आहे. नेप्ती उपबाजार आवारामध्ये शेतकरी हिताचे दृष्टीने शेतकऱ्यांना मुक्कामी राहणेसाठी शेतकरी निवास इमारतीची व्यवस्था केलेली आहे. तसेंच शेतकऱ्यांचे मालाचे योग्य वजन होणेसाठी नेप्ती उपबाजार आवारामध्ये तीन इलेक्ट्रीक भूईकाटयांची उभारणी बाजार समितीने केलेली आहे. तसेंच शेतकरी मालाचे योग्य वजन मिळणेसाठी समितीने अहिल्यानगर येथील भुसार मार्केट यार्ड व नेप्ती उपबाजार आवारामध्ये मापाडयांची नेमणूक केलेली आहे. व राज्यात आदर्शवत अशी ई-काटा पावती शेतकत्यांना तात्काळ दिली जाते व तसा संदेश शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे विनामुल्य पोहचविला जातो.

कृषि उत्पन्न बाजार समिती,अहिल्यानगरने ई-नाम योजनेची २०१७ पासुन प्रभाविपणे अंमलबजावणी किलेली आहे. मागील वर्षे सन २०२४-२०२५ मध्ये समितीचे यार्डवर ई-नाम योजने अंतर्गत एकूण आवक १,४०,५९१ क्विंटल झालेली असून त्यापैकी ७४,३८६ क्विंटल इनाम अंतर्गत विक्री झालेली आहे. व त्याची टक्केवारी ५५.९० आहे. विक्री झालेल्या मालाची किंमत रक्कम रुपये ३५,६६,९७,०९५/- होत आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिती, अहिल्यानगरचे मुख्य बाजार आवार हे २८ एकर असून त्या ठिकाणी भुसार, भाजीपाला, फळे,फुले, व जनावरांचा बाजार तसेंच शेळी मेंढी बाजार भरत असून त्याठिकाणी समितीचे मुख्य कार्यालय व शेतकरी निवास,कमर्शिअल गाळे तसेंच सोलर प्लॅन्ट बसवून समितीचे विजेची बचत केलेली असून त्यामुळे खर्चाची बचत झालेली आहे.

नेप्ती उपबाजार येथील १३.७२ कोटींचे कांदा लिलाव शेड व चिचोंडी पाटील येथील उपाबाजारासाठी रुपये १०.२६ कोटी असे एकूण रुपये २४ कोटी खर्च येणार असून बाजार समिती २५ टक्के स्वनिधी वापरणार असून रुपये १७ कोटी कर्ज मागणी प्रस्ताव पणन मंडळाकडे दाखल केलेला आहे.

बाजार समितीने ई-नाम योजनेची २०१७ पासुन प्रभाविपणे अंमलबजावणी केलेली असून सन २०२४-२०२५ मध्ये १ लाख ४० हजार क्विटंलची आवक ई-नाम द्वारे नोंदली गेली असून त्यापैकी ७४ हजार क्विंटल आवकेची ई-नाम द्वारे विक्री झालेली आहे.