उपबाजार

नेप्‍ती उपबाजार आवार

कृषि उत्पन्न बाजार समिती,अहिल्यानगरचे नेप्ती उपबाजार आवाराची वैशिष्टे

  • शेतक-यांचा शेतमाल मार्केटमध्ये आल्याबरोबर इलेक्ट्रानिक काट्यांवर वजन केले जाते.
  • इलेक्ट्रानिक काट्यांवर वजन केलेनंतर त्याची मापाडी यांचे मार्फ़त व्हेंडींग मशिनद्वारे नोंद होवुन तयार झालेली काटापट्टी नोंदीचा एस.एम.एस शेतकरी यांचे मोबाईलवर जातो.
  • त्यामुळे शेतकरी वर्गाला आपल्या शेतमालाचे झालेले वजन बरोबर आहे की नाही याची खात्री होते.व जर वजनात काही तफ़ावत दिसल्यास तात्काळ आडतदार यांचेशी संपर्क साधुन झालेली चुक सुधारणा करणेची संधी मिळते. त्यामुळे शेतकरी यांचे कोणतेही नुकसान होत नाही.
  • संगणकीकृत काटापट्टी शेतकरी/आडतदार यांना दिली जाते.
  • शेतकरी/व्यापारी/आडतदार यांना सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था केलेली आहे.
  • बाजार आवारात शेतकरी/ व्यापारी यांचे सोयीसाठी 50 टनी क्षमतेचे 2 भुईकाटे तर 80 टनी क्षमतेचा 1 भुईकाटा बसविलेला आहे.सदर भुईकाटे दरवर्षी पडताळणी करुन घेतले जातात. त्यामुळे शेतमालाचे बिनचुक वजन होते.(सदरचा भुईकाटा शेतक-यांसाठी सक्तीचा नसुन एकाच शेतकरी यांचा शेतमाल गाडीत असेल तर किंवा शेतकरी स्वत;चे समाधानासाठी वजन करु शकतात.)
  • शेतक-यांचे प्रत्येक गोणीचे वजन करणेसाठी प्रत्येक गाळ्यांवर/आडतीवर इलेक्ट्रानिक काटे बसविलेले असुन तेथे मापाडी यांची नेमणुक केली आहे.त्यांचेकडून शेतक-यांच्या प्रत्येक गोणिचे बिनचुक वजन केले जाते.
  • नेप्ती उपबाजार आवार मार्केट यार्ड मधिल सर्व रस्ते कोंक्रीटीकरण केलेले आहेत.
  • नेप्ती उपबाजार आवारमधिल सर्व घटकांना (RO) आर ओ चे स्वच्छ पिण्याचे पाण्याची व्यवस्था केलेली आहे.तसेच स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे.
  • नेप्ती उपबाजार आवाराकरीता स्वतंत्र्य विदयुत डी.पी घेवुन संपुर्ण यार्डमध्ये विद्युत व्यवस्था केलेली आहे.
  • नेप्ती उपबाजार आवारात सुचना व माहीती देणेसाठी ध्वनिक्षेपक बसविलेले आहेत.
  • नेप्ती उपबाजार आवारात शेतक-यांना शेतमाल घेवुन आल्यावर मुक्कामासाठी अल्पदराने सुसज्ज शेतकरी निवासाची व्यवस्था केलेली आहे.
  • नेप्ती उपबाजार आवारात शेतमाल घेवुन आल्यावर राज्यातील व राज्याबाहेरील बाजारभाव शेतक-यांना समजणेसाठी डिजीटल बोर्डची व्यवस्था केलेली आहे.